सुलतानपूर, दि. २३ प्रतिनिधी
मौजे राजणी येथील शासनाच्या ले-आऊटमधून प्लॉट मिळालेल्या नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी गट ग्रामपंचायत राजणी-धानोरा कार्यालयासमोर दि. २२ पासून अमरण उपोषण अंदोलन सुरू केले आहे.
प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही प्रश्न निकाली न निघाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. रमेश पुंजाजी डोंगरे व इतर नागरिकांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनामार्फत मिळालेल्या प्लॉटवर त्यांनी घरे बांधली असून ते नियमितपणे घरपट्टी भरत आहेत.
मात्र, कॅनॉलच्या कामामुळे त्यांच्या
वसाहतीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. कॅनॉलमध्ये पाणी भरल्यानंतर ये-जा करण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा
सामना करावा लागत आहे. निवेदनानुसार, संबंधित कॅनॉल सुमारे ३५ फूट रुंद असून मूळ रस्ता सुमारे ९० फूट रुंदीचा होता.
कॅनॉलमध्ये पाणी आल्यानंतर
रस्ताच शिल्लक राहत नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन वापर व रहदारी वर परिणाम होत आहे. तसेच महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा, उपविभागीय अधिकारी कार्यालय मेहकर, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा, पोलीस स्टेशन मेहकर, पंचायत समिती लोणार, मृद व जलसंधारण उपविभाग चिखली तसेच गट ग्राम पंचायत राजणी-धानोरा यांच्याकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
कॅनॉलवरून सुरक्षित व कायम स्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. अमरण उपोषणात सहभागी नागरिकांमध्ये गजानन प्रभाकर साठे, अविनाश नंदकिशोर डोंगरे, अरुण शिवराम साठे, रवी हिम्मत दोडके, दिनकर संपत दोडके, संजय पुंजाजी डोंगरे, हिम्मत संपत दोडके, शारदा नंदकिशोर डोंगरे, छाया रमेश डोंगरे, लीलावती संजय डोंगरे, शेषाबाई हिम्मत दोडके आणि गंगाबाई संदीप दोडके यांचा समावेश आहे.
पावसाळा सुरू झाला असुन रसत्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने दि. २३ ला रा.कॉ.
श.प. सदानंद पाटील तेजनकर , माजी सरपंच हणुमंतराव चव्हाण , समाधान साठे , सुरज साठे , प्रकाश चव्हाण यांणी उपोषण मंडपाला भेट दिली तसेच लोणार पस चे विस्तार अधिकारी गजानन कावरखे , रामेश्वर चनखोरे ग्रामपंचायत अधिकारी रहाटे , राधेशाम दळवी , तलाठी तोंडे मॅडम , यांणी अंदोलकांशी चर्चा केली मात्र तहसील आणि जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रा शिवाय अंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका घेतली .
" सन १९९१ मध्ये तहसील ने वाढीव गावठाना अर्तगत हे भुखंड वाटप केले असुन हे रस्ते जलसंधारन विभागाच्या कॅनाल मुळे बाधीत झाले आहेत .आता पर्यंत हे भुखंड खुले असल्याने अडचन नव्हती , तहसील ने या भुखंडाचे व रसत्याचे सिमांकन करूण दिल्यास लगेच रस्त्याच्या कामाला सुरवात करता येईल " .
-- दत्तात्रय पडघान
सरपंच
धानोरा -राजणी गट ग्रामपंचायत .

Post a Comment
0 Comments