*सुलतानपूर, दि. २ (प्रतिनिधी)* : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये नवोदय शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सुलतानपूर द्वारा संचालित डॉ. आर. एन. लाहोटी ज्यु. सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
*११९ पैकी ९१ विद्यार्थी विशेष प्राविण्यात*
यावर्षी कॉलेजमधून एकूण ११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सर्व ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे ९१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली, २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कॉलेजने सलग १००% निकालाची कामगिरी कायम ठेवत शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
*गुणवंत विद्यार्थ्यांची यादी*
कॉलेजचा निकाल उज्ज्वल करण्यात या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे:
- *प्रथम क्रमांक*: अथर्व संतोष खुळे - ९१.३३%
- *द्वितीय क्रमांक*: कु. क्षितिजा एकनाथ काकडे - ९०.३३%
- *तृतीय क्रमांक*: कु. सिया मनोज खुळे - ८९.८३%
*इतर गुणवंत विद्यार्थी:*
गणेश भुजंग वायाळ ८८.६७%, कु. स्नेहा प्रभाकर मोरे ८८.००%, अलोक रोहिदास परमेश्वर ८७.६७%, शंतनू गजानन वायाळ ८७.६७%, सुशांत दीपक परमेश्वर ८७.५०%, कु. आर्या महेश पिंपरकर ८७.५०%, संकल्प निलेश काळेगावकर ८७.५०%.
*संस्थाचालकांकडून अभिनंदन*
या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. हेमराजजी लाहोटी, सचिव डॉ. शशीराजजी लाहोटी, उपाध्यक्षा डॉ. ज्योतीताई श. लाहोटी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य शिवानंद सोनुने व सर्व प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
"विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले," अशी प्रतिक्रिया प्राचार्य सोनुने यांनी दिली. कॉलेजच्या या यशाबद्दल सुलतानपूर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments