Type Here to Get Search Results !

रमेश अण्णा मुळे यांचा RPI मध्ये जाहीर प्रवेश ! रामदास आठवले यांणी दिली मोठी जबाबदारी ; राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! "मराठा आघाडीच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती; ग्रामीण भागातील प्रभावामुळे संघटन वाढीस बळ " !

 रमेश अण्णा मुळे यांचा RPI मध्ये जाहीर प्रवेश ! रामदास आठवले यांणी दिली मोठी  जबाबदारी ; राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट !

"मराठा आघाडीच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती; ग्रामीण भागातील प्रभावामुळे संघटन वाढीस बळ "





लोणार दि .२३ (प्रतिनिधी )

जेष्ठ समाजसेवक व विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे सुपरिचित असलेले रमेश अण्णा मुळे यांनी नुकतीच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी  आठवले  यांची भेट घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (RPI) जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


रमेश अण्णा मुळे हे समाजकार्य, ग्रामीण विकास आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अनेक घटकांना जोडण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ना.रामदास आठवले  यांनी त्यांना पक्षात मानाचे स्थान देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या अध्यक्षपदी द नियुक्त केले असुन तसे पत्र ना. आठवले यांणी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ता. २३ एप्रिल ला दिले .



ना. रामदास आठवले यांनी रमेश अण्णा मुळे यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास व्यक्त करत, विशेषतः ग्रामीण भागात त्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग असल्याने 

संघटन वाढीस बळ मिळणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत .


मुळे यांच्या प्रवेशामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संघटन विस्ताराला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मराठा समाजासोबत इतर घटकांनाही जोडण्याची त्यांची क्षमता पक्षासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


या घडामोडीमुळे आगामी काळात राज्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि मराठा मतदारांमध्ये आठवलेंच्या रिपाई चा प्रभाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत.


"रमेश अण्णा मुळे यांनी यावेळी सांगितले की,

"सर्व समाजाला सोबत घेऊन देशाच्या विकासासाठी कार्य करण्याचा माझा संकल्प आहे. ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे कार्य अधिक व्यापक पद्धतीने करता येईल .

रमेश अण्णा मुळे यांचा RPI मध्ये प्रवेश हा केवळ पक्षवाढीसाठीच नव्हे, तर राज्यातील सामाजिक व राजकीय संतुलनासाठीही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments