Type Here to Get Search Results !

मेहकर-लोणार मतदारसंघात RPIचा बोलबाला; युवकांचा जाहीर पक्षप्रवेश ! "सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश "

 मेहकर-लोणार मतदारसंघात RPIचा बोलबाला; युवकांचा जाहीर पक्षप्रवेश !

"सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश "



मेहकर दि. २२ (प्रतिनिधी) :

मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, दि. २१ एप्रिल रोजी मोठ्या संख्येने युवक व कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यामागे मराठा आघाडीचे  प्रदेशाध्यक्ष रमेश अण्णा मुळे, बुलढाणा निरीक्षक तथा समाजभूषण गोल्डनमॅन बाळकृष्ण इंगळे साहेब आणि भाई दिलीपजी खरात यांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले.


या वेळी जेष्ठ नेते विजय दादा सपकाळ, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप काकडे सर, युवा नेते संदीप भाई गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये राणा भाई मोरे, संदीप इंगळे, पुजाराम इंगळे, सलीम भाई कुरेशी, प्रशांत गवई, महेंद्र भालेराव, पवन साळवे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.


या सर्वांनी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.


कार्यक्रमात बोलताना नेत्यांनी सांगितले की, “रिपब्लिकन पक्ष हा वंचित, शोषित आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असून, युवकांच्या वाढत्या सहभागामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळत आहे.”



"या  पक्षप्रवेशामुळे मेहकर-लोणार मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद वाढणार असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. "

Post a Comment

0 Comments