सुलतानपुर दि. २७ (प्रतिनीधी )
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप व डेंगू नियंत्रणासाठी केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, सुलतानपूर येथील आरोग्य सहाय्यक श्री अनिल मुरलीधर गुंजकर यांना जिल्हा हिवताप कार्यालय, बुलढाणाच्या वतीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा हिवताप कार्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मंडाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते व जिल्हा हिवताप अधिकारी श्री चव्हाण यांच्या हस्ते श्री गुंजकर यांना मानाची ट्रॉफी व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला.
श्री गुंजकर यांनी गावपातळीवर आरोग्यसेवा पोहोचवण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या कामाची ठळक वैशिष्ट्ये- नियमित घरभेटी देऊन हिवताप व डेंगूचे सर्वेक्षण- डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करणे- पाणी साठलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडून जैविक नियंत्रण- नागरिकांना घरातील कंटेनर, टायर, कुंड्यांमध्ये पाणी साचू न देण्याबाबत मार्गदर्शन
- डासांच्या आळ्या होऊ नयेत म्हणून घरोघरी प्रबोधन
- हस्तपत्रिकांचे नियमित वाटप करून माहिती प्रसार
*शाळा व ग्रामपंचायत स्तरावर उपक्रम* !
- शाळेतील विद्यार्थ्यांना हिवताप-डेंगू प्रतिबंधाबाबत शिक्षण
- ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रमांचे प्रभावी आयोजन
- सामूहिक सहभागातून रोग प्रतिबंधावर भर
*आरोग्य सेवेचा आदर्श*
श्री गुंजकर यांच्या सातत्यपूर्ण व नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे सुलतानपूर परिसरात हिवताप व डेंगूच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. त्यांचे काम इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरले आहे.
"गाव हेच कुटुंब मानून काम केले तर निश्चितच आजारांवर नियंत्रण मिळवता येते," अशी भावना यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री गुंजकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा आरोग्य विभागाने श्री गुंजकर यांच्या कार्याची दखल घेत भविष्यात इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनीही अशीच कार्यपद्धती अवलंबवावी, असे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments