Type Here to Get Search Results !

पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर मध्यरात्री सोडवले; प्रशासनाने मागण्या मान्य केल्या ! रमेश अण्णा मुळे व भाई दिलीप खरात यांचा पुढाकार !

 पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर मध्यरात्री सोडवले; प्रशासनाने मागण्या मान्य केल्या !

रमेश अण्णा मुळे व भाई दिलीप खरात यांचा पुढाकार !


सिंदखेडराजा (ता. २१) प्रतिनिधी :

सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर वरदडी येथील मोरे भाऊ यांचे रस्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण अखेर पाचव्या दिवशी रात्री सुमारे ११ वाजता सोडवण्यात आले. प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर हा तिढा सुटला.


गेल्या पाच दिवसांपासून मंडुबाई सुदाम साळवे , जिजाबाई प्रभु मोरे , विजय सुदाम साळवे यांचे उपोषण सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. मात्र, काल आरपीआय मराठ आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेश अण्णा मुळे हे संभाजीनगरकडे जात असताना, भाई दिलीपजी खरात यांनी त्यांना थांबवून उपोषणस्थळी नेले.


रात्री उशिरा अण्णांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर तात्काळ एसडीएम खडसे  व तहसीलदार दिवटे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आणि अखेर उपोषण मागे घेण्यात आले.


या प्रसंगी दिलीप काकडे , संजय दाहीवाल, मधुकर शिंदे, तेजराव मस्के, विजय भालमोडे, सुनील सरकटे, किशोर पाडमुख, पवन साळवे, संतोष ससाने, बजरंग भाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या घटनेमुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यास जनतेच्या प्रश्नांना योग्य वेळी न्याय मिळू शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.




Post a Comment

0 Comments