Type Here to Get Search Results !

प्रामाणिकतेचा मानाचा मुकुट; पंजाबराव बोबडे यांना ‘गुणवंत कर्मचारी’ पुरस्कार !



 सुलतानपुर, दि. २८ (प्रतिनिधी)


 महावितरणमधील विभागातील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक कामकाजाने  सर्वांना परिच असलेले श्री. पंजाबराव बोबडे यांना “गुणवंत कर्मचारी पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ वृत्तीची आणि उत्कृष्ट सेवाभावाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून, त्यांच्या यशाने विभागाचा गौरव वाढवला आहे.


ग्राहकाभिमुख सेवा, तक्रारींचे त्वरित निवारण आणि कामात पारदर्शकता—या त्रिसूत्रीवर काम करत श्री. बोबडे यांनी आपल्या कार्यकाळात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच ते केवळ विभागातच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळखले जातात.


पंजाबराव बोबडे यांचे व्यक्तिमत्त्वही तितकेच प्रभावी आहे. मितभाषी, हसतमुख आणि प्रचंड संघटन कौशल्य असलेले ते व्यक्तिमत्त्व परिसरात सर्वदूर परिचित आहे. त्यांच्या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे सहकारी व नागरिकांशी त्यांनी घट्ट नातं निर्माण केलं असून, संघटनात्मक कामात त्यांनी वेळोवेळी प्रभावी नेतृत्वही सिद्ध केलं आहे.


त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महावितरण विभागाचा मान उंचावला असून, अनेकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. या सन्मानाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments