एकुलत्या एक मुलाच्या आत्महत्येने वृद्ध दळवी दांपत्य बेसहारा !
सुलतानपूर, दि. ७ (प्रतिनिधी) सुलतानपूर येथील एका बेरोजगार युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सुलतानपूर येथील वयोवृद्ध भिमराव दळवी (महाराज) यांचा एकुलता एक मुलगा दत्तात्रय भिमराव दळवी (वय २४) याने गावालगत असलेल्या कालव्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
दत्तात्रय हा बेरोजगार असून शांत स्वभावाचा होता .
धार्मिक वृत्तीचे आई-वडील असलेल्या दळवी कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वृद्धापकाळात एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडील अक्षरशः पोरके झाले आहेत.
विशेष म्हणजे, मृतकाच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी त्याच दिवशी लग्न समारंभ असल्याने घरात पाहुण्यांची ये-जा आणि लगबग सुरू होती. अशा परिस्थितीत ही दुर्दैवी घटना समोर आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतकाच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरुण मृतका चे शव मेहकर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना नासाठी नेण्यात आहे या प्रकरणी मर्ग दाखल करीत पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शिवानंद केदार , राजेश जाधव , कॉन्स्टेबल , पांडे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments