सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्याला महत्त्वाची जबाबदारी; राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव
बुलडाणा, दि. ६ (प्रतिनिधी) –
शिव, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रेरित होऊन सामाजिक चळवळीत सक्रियपणे कार्य करणारे खंबीर नेतृत्व तथा निष्ठावंत कार्यकर्ते अॅड. कैलास कदम यांची भीम आर्मी भारत एकता मिशनच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे सामाजिक वर्तुळात आणि चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तथा आझाद समाज पार्टी (कांशीराम)चे प्रमुख खासदार अॅड. भाई चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देऊन अॅड. कैलास कदम यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अॅड. कैलास कदम हे दीर्घकाळापासून सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित कार्यात सक्रिय आहेत. आपल्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक शोषित, वंचित आणि पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवणे, तरुणांना सामाजिक चळवळीशी जोडणे, महिलांच्या प्रश्नांवर लढा उभारणे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे अशा विविध उपक्रमांत ते सातत्याने कार्यरत आहेत.
त्यांच्या या निस्वार्थ सामाजिक कार्याची आणि संघटनात्मक कौशल्याची दखल घेत भीम आर्मी भारत एकता मिशनने त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सचिवपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यात संघटनेची ताकद अधिक वाढेल आणि वंचित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भीम आर्मी भारत एकता मिशन ही सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांवर आधारित संघटना देशभरात वेगाने विस्तारत आहे. महाराष्ट्रातही संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना संघटित करण्यासाठी अॅड. कैलास कदम यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितले.
अॅड. कैलास कदम यांच्या या निवडीबद्दल बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून सामाजिक संघटना, कार्यकर्ते, वकील, पत्रकार आणि समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments