लोणार दि. ४ (प्रतिनिधी )
बुलढाणा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या नव्या बांधणीला जोरदार सुरुवात झाली असून जिल्हाभरात शाखा उभारणीचा धडाका सुरू आहे. डॉ. रामदास आठवले साहेबांवर विश्वास ठेवून समाजभूषण गोल्डमेन भाई दिलीपजी खरात (जिल्हाध्यक्ष, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश व शाखा बांधणी सुरू आहे.
दि. १ मार्च ला लोणार तालुक्यातील भुमराळा, दरीगाव आणि सेवानगर या गावांमध्ये मोठ्या उत्साहात शाखा उद्घाटन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार व व्याख्याते अविनाश दादा राठोड यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे रामभाई चौधरी पाटील, सतीश लांडगे, मान्यवर सरपंच तसेच शेकडो युवकांनी जाहीरपणे पक्षात प्रवेश केला.
मार्गदर्शन करताना भाई दिलीपजी खरात म्हणाले, “साहेबांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आम्ही समाजसेवेतून सार्थ ठरवू. निळ्या झेंड्याखाली काम करत नवे-जुने सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वांना सोबत घेऊन गावा-गावात शाखा उभारू, घराघरात आर.पी.आय.चा कार्यकर्ता निर्माण करू. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढवून पक्षाचा निळा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून जोमाने कामाला लागावे.” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष ह.भ.प. कीर्तनकार वंदनाताई वाघ, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप काकडे, जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश पाटील, लोणार तालुका अध्यक्ष समाधान सरदार, सिदखेड राजा तालुका अध्यक्ष भानदास शेजुळ, विशाल दादा मोरे पाटील, विशाल शेजुळ, युवा नेते संतोष भाई ससाणे, प्रबोधनकार पवनदादा साळवे, सागर आ. पनाड, जावळे , दाभाडे , गौतम भाई खाडे, पँथर वाजीद भाई, जाफर भाई तसेच परिसरातील शेकडो महिला-पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


Post a Comment
0 Comments