Type Here to Get Search Results !

सुलतानपूरच्या खेळाडूंना डॉ. हेमराज लाहोटी यांच्या कडून क्रिडा साहित्याची भेट ; 'पळसखेड चषक २०२६' मध्ये टी-शर्टचे शानदार अनावरण!*



​सुलतानपूर दि. १ (प्रतिनिधी )

येथील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. हेमराज लाहोटी यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या वतीने जय भवानी क्रिकेट क्लब, सुलतानपूर च्या सर्व खेळाडूंना दि. १ मार्च ला क्रिकेट टी-शर्ट किट आणि बॅटची विशेष भेट देण्यात आली आहे.

​सध्या पळसखेड येथे अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या 'पळसखेड चषक २०२६' या स्पर्धेच्या मैदानावर या टी-शर्ट किटचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात किटचे अनावरण करून खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी परिसरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर या  आनंदाच्या प्रसंगी जय भवानी क्रिकेट क्लबचे कर्णधार शुभम दानवे , उपकर्णधार विवेक कडुकर , प्रदिप सुरुशे , भारत खोटे , व्यंकटेश इंगोले , शुभम सरदार , बंटी नालींदे , दिपक लोखंडे , शे. अफ्रोज , पिंटु लाहोटी , वैभव आनंदराव , सचिन मोरे , संभा सुरुशे , राजु काळे , राजेश वाघ यांच्यासह इतर क्लबचे 

सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या खेळाडूंच्या हस्ते नवीन किट मिळाल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे दिसून आले. अशा प्रकार च्या प्रोत्साहन पर उपक्रमामुळे व 

​ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार साहित्य मिळाल्यास ते उत्तम कामगिरी करू शकतात, याच भावनेतून डॉ. हेमराज लाहोटी यांनी ही मदत केली आहे. या मदतीबद्दल कर्णधार शुभम दानवे व  सर्व खेळाडूंनी डॉ. लाहोटी यांचे विशेष आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments