सुलतानपूर दि. २५ (प्रतिनिधी) – शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजयभाऊ लाहोटी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू व वंचित घटकांसाठी सेवा उपक्रम राबवून त्यांनी समाजाप्रती असलेली आपली जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली.
ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य संजयभाऊ लाहोटी यांनी उभे केले आहे. आधुनिक वैद्यकीय शिक्षणासोबत आयुर्वेद व होमिओपॅथीचा समन्वय साधत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा दिली असून समाजहिताचा आदर्श निर्माण केला आहे.
यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ मार्च रोजी सायंकाळी मातोश्री वृद्ध (बिबी) आश्रम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजय लाहोटी यांच्या हस्ते आश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न व भोजन देण्यात आले. प्रेमाने व आपुलकीने दिलेल्या या भोजनामुळे आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मातोश्री गोशाळेतील सुमारे ९० गाईंना एक वेळेचा चारा संजु भाऊ मित्र मंडळाच्या वतीने पुरविण्यात आला. या उपक्रमामुळे प्राणीमात्रांप्रती करुणा व संवेदनशीलतेचा संदेशही देण्यात आला.
या प्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. के. गायकी यांनी संजय लाहोटी यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. समाजातील दुर्बल घटकांसाठी ते सातत्याने कार्यरत राहून प्रेरणादायी उदाहरण घालत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला आवारे, पत्रकार सागर पनाड, सुभाष नरवाडे, शुभम खंड, भाऊराव भालेराव, कैलास काळे तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी संजयभाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
समाजसेवा, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांचा समतोल साधत संजय लाहोटी यांनी उभा केलेला आदर्श कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांचा वाढदिवस सेवा व सामाजिक जाणीवेचा संदेश देणारा ठरला.


Post a Comment
0 Comments