Type Here to Get Search Results !

आदिवासी युवकांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश ! जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात यांचा जिल्हाभर झंझावात !



लोणार दि. १६  (प्रतिनिधी )

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांनी स्थापन केलेल्या सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या विचारांवर उभारलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या चळवळीला पुन्हा एकदा नवी ऊर्जा मिळाली असून लोणार येथे शेकडो आदिवासी युवकांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात दि. १५ मार्च ला  जाहीर प्रवेश केला.

लोणार येथील रेस्ट हाऊस येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात आदिवासी समाजातील शेकडो युवकांनी पक्षात प्रवेश करून सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाच्या लढ्याला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाई दिलीप खरात यांनी भूषविले. यावेळी मुरलीधर गवई ,दिलीप काकडे,समाधान सरदार, पवन साळवे, यांच्यासह संतोष ससाने, गौतम खाडे, अविनाश राठोड, माजी सरपंच सतीश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदिवासी समाजातील नेते शिवाजीभाऊ कोकाटे तसेच युवा नेतृत्व संदीप  इंगळे यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष भाई दिलीपजी खरात यांच्या हस्ते सर्व नव्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान सरदार यांनी केले. त्यानंतर मुरलीधर गवई, दिलीप काकडे आणि पवन साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना रिपब्लिकन पक्ष हा केवळ राजकारणासाठी नसून समाजाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात दिलीपजी खरात यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येय-धोरण, सामाजिक बांधिलकी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देत युवकांना आवाहन केले. “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण आहे. अन्याय-अत्याचाराविरोधात हा पक्ष नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन. कोणत्याही अडचणीच्या वेळी मला फोन करा, मी तुमच्या सेवेत तत्पर राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या, स्वाभिमानाच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांनी प्रेरित होऊन आदिवासी युवकांनी रिपब्लिकन चळवळीत उडी घेतल्याने जिल्ह्यात पक्षाला नवी ताकद मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नेते सतीश लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या जाहीर प्रवेशामुळे लोणार तालुक्यात रिपब्लिकन चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments