दादुल गव्हाण फाट्यावरील श्री फलेश्वर मंदिर उजळले; डॉ.हेमराज लाहोटींच्या प्रयत्नांना यश !
स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरमुळे भाविकांना दिलासा !
सुलतानपुर दि . २४ (प्रतिनिधी)
सुलतानपुर, चिंचोली बोरे, दादुल गव्हाण व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री फलेश्वर मंदिर येथे मागील काही वर्षांपासून वीजेची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे भाविकांना अंधारातच दर्शन घ्यावे लागत होते.
ही अडचण दूर करण्यासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार डॉ.संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नातून, तसेच डॉ. हेमराज लाहोटी यांच्या विशेष मागणीवरून मंदिरासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर (डीपी) मंजूर करण्यात आला.
या ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटनाचा सोहळा दि. २४ फ्रेब्रु. ला मोठ्या उत्साहात डॉ. हेमराज लाहोटी यांच्या हस्ते पार पडला. या निर्णयामुळे मंदिर परिसरात कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरू झाला असून, भाविकांना आता उजेडात व सुरक्षित वातावरणात दर्शन घेता येणार आहे
विदुत व्यवस्था उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांची गैरसोय टळणार असून, या कार्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे या वेळी मारोतराव सुरुशे, दत्ता रिंढे , ज्ञानेश्वर बोबडे , दामोधर कुडके सह परिसरातील भाविक उपस्थित होते .


Post a Comment
0 Comments