संदिपदादा शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त !🩸 100 रक्तदान शिबिर महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सुलतानपुर येथे यशस्वी आयोजन !🩸
लोणार दि. २७ शुभम दानवे (प्रतिनिधी)
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक मा. संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त 1 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत 100 रक्तदान शिबिर महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञांतर्गत दि. 26 फेब्रुवारी रोजी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलढाणा संस्थेच्या सुलतानपुर शाखेत रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिराची सुरुवात महापुरुषांना वंदन करून करण्यात आली. कार्यक्रमास माऊली मेडीकल कॉलेज चे अध्यक्ष संजय लाहोटी, विवेकानंद सिरसाट पाटील, शंकरराव गायकवाड, नंदकिशोर पवार, डॉ. विनोद भानापुरे, पत्रकार सागर पनाड, बब्बू पठाण, शेषराव तेजनकर, पत्रकार शे. इम्रान, समाधान पिसे, विलास थोरात, उबाठा शिवसेना शहर अध्यक्ष शिवप्रसाद जोगदंड ,माजी सरपंच विकास पिसे, अनंता पिसे, शाहीन पटेल, ज्ञानेश्वर धुडकेकर (शाखा व्यवस्थापक – छत्रपती अर्बन) यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान शिबिरात नागरिकांनी व रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. रक्तदात्यांचा गौरव म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सुलतानपुर येथील स्थानिक संचालक मंडळातील सर्व सदस्य, प्रतिष्ठित खातेदार, शाखा व्यवस्थापक तसेच सर्व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून समाजोपयोगी कार्याची प्रेरणा मिळत असून, रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा संकल्प यशस्वी होत असल्याचे चित्र दिसून आले.

Post a Comment
0 Comments