Type Here to Get Search Results !

सामान्यातील असामान्य आदर्शवत व्यक्तीमत्व ; वसंतभाऊ जुमडे यांचे वाढदिवस अभिष्टाचिंतन !

सामान्यातील असामान्य आदर्शवत व्यक्तीमत्व ;
  वसंतभाऊ जुमडे यांचे वाढदिवस अभिष्टाचिंतन !



आजच्या धावपळीच्या, स्वार्थी होत चाललेल्या समाजातही काही माणसं अशी असतात की जी शांतपणे, न गाजावाजा करता, सतत इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरत राहतात. वसंतभाऊ जुमडे हे त्यातीलच एक जिवंत उदाहरण आहे. शांत संयमी स्वभाव, सदा हस्तमुख चेहरा आणि कुणीही अडचणीत दिसला की क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती, हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं सौंदर्य आहे.

मंडप शिलाई क्षेत्रात महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे संतकृपा मंडपशिलाई केंद्र केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता, हजारो कुटुंबांसाठी स्वाभिमानाने जगण्याचा आधार ठरले आहे. स्वतः पुढे जाण्याबरोबरच इतरांनाही उभं करण्याचं ध्येय वसंतभाऊंनी आयुष्यभर जपलं. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे असंख्य युवक-युवतींना स्वयरोजगाराची दिशा मिळाली.

पत्रकार म्हणूनही वसंतभाऊंनी समाजातील वास्तव, कष्टकरी वर्गाचे प्रश्न, आणि दुर्लक्षित घटकांचे दुःख प्रामाणिकपणे मांडले. त्यांच्या लेखणीत कटुता नव्हे तर संवेदनशीलता आहे; आरोप नव्हे तर सत्य आहे. म्हणूनच ते केवळ पत्रकार नसून, समाजाचा आवाज बनले आहेत.

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या मूल्यांवर उभं असलेलं त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे आजच्या पिढीसाठी एक चालतं-बोलतं विद्यापीठ आहे. प्रसिद्धीपेक्षा कार्याला महत्त्व देणारे, पदापेक्षा माणसाला जपणारे वसंतभाऊ, अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त एवढेच मनापासून म्हणावेसे वाटते की —
माणसं मोठी होत नाहीत, त्यांची माणुसकी मोठी असते… आणि वसंतभाऊ त्या माणुसकीचे उत्तम प्रतीक आहेत.

त्यांचे भावी आयुष्य निरोगी, दीर्घायुषी, आनंदी व समाजसेवेसाठी सदैव कार्यरत राहो, हीच संत सखाराम महाराजांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. 

शुभेच्छुक :- समस्त कष्टकरी संघ .

Post a Comment

0 Comments