Type Here to Get Search Results !

सुलतानपुरचा शिवम देवानंद सुरूशे बनला हवाई दलात ‘एअर मॅन’ बिकट परिस्थितीवर मात करत गाठली यशाची शिखरे ! विवेकानंद स्टडी सेंटरच्या मार्गदर्शनाचा निर्णायक हातभार !

 सुलतानपुरचा शिवम देवानंद सुरूशे बनला हवाई दलात ‘एअर मॅन’

बिकट परिस्थितीवर मात करत गाठली यशाची शिखरे !

विवेकानंद स्टडी सेंटरच्या मार्गदर्शनाचा निर्णायक हातभार !


सुलतानपुर दि. १० 

(ता. लोणार) येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील आणि व्यावसायिकरित्या स्कूलबस चालक असलेल्या देवानंद सुरूशे यांचा मुलगा शिवम देवानंद सुरूशे याने अतूट मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय हवाई दलात एअर मॅन म्हणून नाव मिळवले आहे. गावासह संपूर्ण परिसरासाठी ही अभिमानाची बातमी असून तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.


घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानादेखील शिवमने शिक्षणात खंड पडू दिला नाही. वडिलांच्या मेहनतीवर चालणारे घर, मर्यादित साधनं, वाढते खर्च… पण या सर्वांवर मात करत स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार त्याने कधीही सोडला नाही.


हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न त्याने घट्ट धरून ठेवले होते. त्यासाठी अभ्यासाबरोबरच फिटनेस, शिस्त आणि नियमन यांवर त्याने विशेष भर दिला.


विवेकानंद स्टडी सेंटरची भक्कम साथ !


सुलतानपुरमध्ये विनामूल्य चालविण्यात येणाऱ्या ‘विवेकानंद स्टडी सेंटर’ या विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी महत्वपुर्ण ठरले आहे .शिवमला मार्गदर्शन, योग्य दिशा आणि अभ्यासातील आवश्यक ते सर्व सहकार्य दिले.


या केंद्रातील अभ्यासाची पद्धत, वातावरण आणि सततचे प्रोत्साहन यामुळेच त्याच्या स्वप्नांना उभारी मिळाली.

शिवम स्वतःच्या जोरावर मेहनत करत राहिला आणि आज त्या प्रयत्नांचे सार्थक रूप हवाई दलाच्या एअर मॅन पदावर निवड होण्याच्या रूपाने दिसून आले आहे.

कुटुंबाचा आणि गावाचा अभिमान !

शिवमच्या यशामुळे सुरूशे कुटुंबाचा मान उंचावला असून वडिलांसह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. सामान्य कुटुंबातील मुलगा कठीण परिस्थितीतून उभा राहत देशसेवेसाठी सिद्ध होतो आहे, ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

“मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन – हेच माझ्या यशाचे गमक” – शिवम सुरूशे

शिवमने यशाचे श्रेय आपल्या पालकांना, मार्गदर्शकांना आणि विवेकानंद स्टडी सेंटरला देत सांगितले की,

“कोणतीही परिस्थिती कठीण नसते, जोपर्यंत आपण प्रयत्न सोडत नाही.”

सुलतानपुर व परिसरातील तरुणांसाठी शिवमची कहाणी आता प्रेरणेचा नवा स्रोत ठरणार आहे. मेहनत, संघर्ष आणि योग्य दिशा मिळाल्यास अशक्य काहीच नाही, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

Post a Comment

0 Comments