Type Here to Get Search Results !

डॉ. हेमराज लाहोटी यांच्या वाढदिवसा निमित्त समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन ! मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान व रक्तदान शिबीराचे १२ डीसेंबर ला आयोजन !

 डॉ. हेमराज लाहोटी यांच्या वाढदिवसा निमित्त समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन !

 मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान व रक्तदान शिबीराचे १२ डीसेंबर ला आयोजन !

सुलतानपूर दि. ९ (प्रतिनिधी )

सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात सदैव आघाडीवर राहून लोकसेवेची नवी परंपरा जपणारे शिवसेना नेते डॉ. हेमराज लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही  समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे. श्री गणपती नेत्रालय, जालना व माऊली आय केअर अँड ऑप्टिकल्स सुलतानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू निदान शिबीर तसेच प्रसाद ब्लड स्टोरेज सुलतानपुर च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ, सुलतानपूर येथे होणार असल्याने गरजुनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

या शिबिरामध्ये नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरां कडून अत्याधुनिक मशीनव्दारे नेत्र तपासणी, दृष्टी मोजणी व मोतीबिंदू निदान करण्यात येणार असुन  आवश्यक लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप केले जाणार आहेत तर गरजे नुसार   रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

त्याचबरोबर समाजातील तरुणाईला रक्तदानास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भव्य रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाच्या ऑनलाइन रेशनकार्ड श्रेणीवर आधारित विशेष लाभ ही दिले जाणार आहेत .

AAY रेशनकार्ड धारकांना श्री गणपती नेत्रालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,

PHH रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेचा लाभ दिला जाणार आहे . त्यामुळे 

तपासणीसाठी येताना आधारकार्ड, ऑनलाइन रेशनकार्ड व KYC सहित मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.

महिला व जेष्ठ नागरिकांना प्राधान्य असणार आहे

तर जेष्ठ महिला नागरिकांना तसेच  लहान मुलींना नेत्र तपासणीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. 

डॉ. हेमराज लाहोटी यांच्या वतीने आयोजीत  दरवर्षी च्या विविध मोफत आरोग्य शिबीरांचा अनुभव पाहता ग्रामीण भागातून गरजु रुग्ण व नागरिक मोठ्या प्रमाणात   शिबिराचा लाभ घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


डॉ. हेमराज लाहोटी यांची लोकसेवेतील सातत्यपूर्ण परंपरा !

"सुलतानपूर परिसरात सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यात सदैव सक्रिय असलेल्या डॉ. हेमराज लाहोटी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध आरोग्यविषयक शिबिरांच्या आयोजनातून लोकसेवेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गरजू व सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत सेवा उपलब्ध करून देत सतत समाजजागृतीचे काम त्यांनी केले आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राबवण्यात येणारे असे समाजोपयोगी उपक्रमांची  नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने दखल घेतले जाते " .




Post a Comment

0 Comments