Type Here to Get Search Results !

ग्रामस्थांनी घरपट्टीसह दिवाबत्ती करात ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा - डॉ . हेमराज लाहोटी सुलतानपुर ग्रामपंचायत ची तातडीने अंमलबजावणी; नागरिकांना फायदा

 ग्रामस्थांनी घरपट्टीसह दिवाबत्ती करात ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा - डॉ . हेमराज लाहोटी 


सुलतानपुर ग्रामपंचायत ची  तातडीने अंमलबजावणी; नागरिकांना फायदा 


लोणार  दि .२९ (प्रतिनिधी)

लोणार  तालुक्यातील सुलतानपुर ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे या  ग्रामपंचायतीने निवासी मालमत्ता कर (घरपट्टी), पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर एकरकमी भरल्यास तब्बल निम्मी

सवलत देण्याची घोषणा सरपंच किरणताई हेमराज लाहोटी  यांनी केली आहे. ग्रामपंचायतच्या कर वसुलीस चालणा मिळून त्याचा सकारात्मक परिणाम विकासात्मक बाबींवर व्हावा यासाठी  डॉ. हेमराज लाहोटी ह्यांच्या पुढाकाराने ही योजणा राबविली जात आहे .

  योजना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. गावातील ग्रामपंचायतींमध्ये करवसुली अपुरी असल्याचे विविध ठिकाणी शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सबळ व्हाव्यात आणि स्थानिक

विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी ही कर सवलत योजना राज्यभर राबविण्यात येत आहे.


या पार्श्वभूमीवर  सरपंच लाहोटी , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी गजानन कावरखे यांणी

 मासिक सभा घेऊन हा निर्णय घेत ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे .

३१ डिसेंबर २०२५ ही सवलतीची अंतिम मुदत पर्यंत आहे तरी ग्रामस्थांनी  लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच  व ग्रामपंचायत अधिकारी  यांनी केले आहे. कर सवलत ही अभियानापुरती मर्यादित असल्याने ग्रामस्थांनी ३१ डिसेंबरपूर्वी एकरकमी कराची भरपाई केल्यासच ५० टक्के सवलतीचा लाभमिळणार आहे. एकरकमी कर सवलतीमुळे ग्रामपंचायतीला थकीत कर वसुलीस मदत होणार आहे तर ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. या मुळे ग्रामसेवकांवरील ताण कमी होणार हे जरी सत्य असले तरी ;  

लाखो रुपये कर असलेल्या ग्रामपंचायतींना या शासनाच्या ५० टक्के सवलतीमुळे दिलासा  मिळणार तसेच करांची वसुली न झाल्यास वरिष्ठ अधिकारी कारवाई करत असल्याने ग्रामसेवकांवर मोठ्या प्रमाणात येणारा ताण निश्चितच हलका होणार असल्याने वसुली साठी लागणार वेळ  ग्रामपंचायत च्या विकासात्मक कामासाठी मिळु शकतो त्या मुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या या सवलतीचा तालुक्यातील ग्रामस्थांनी  लाभ घेण्याचे  आवाहन डॉ. हेमराज लाहोटी यांणी केले आहे .

बॉक्स :

प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधीत ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊन , निवासी मालमत्ताधारकांना दि . १ एप्रील २०२५ पुर्वीच्या एकुण निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर, पाणीपट्टी  कर इत्यादी करांच्या थकबाकीमध्ये ५०% टक्के सवलत द्यायची किंवा नाही , या बाबदचा निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतींना असेल यासाठी ग्रामपंचायतीने " विशेष ग्रामसभा " बोलावुन त्यात बहुमताने ठराव मंजुर करणे अनिवार्य असुन सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही  घटी शासनाकडून भरपाई करण्यात येणार नसल्याचे ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या शासन निर्णयात नमुद आहे "




Post a Comment

0 Comments