Type Here to Get Search Results !

विवेकानंद स्टडी सेंटरची वंचींतां सोबत दिवाळी ।




सुलतानपुर दि .२४ (प्रतिनिधी )

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद स्टडी सेंटर, सुलतानपुर यांनी सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा आदर्श जपत दि. २३ ऑक्टोबर रोजी पारधी समाज बांधवांसोबत भाऊबीज साजरी करून दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला.


या उपक्रमाअंतर्गत पारधी समाजातील महिलांना साडी-चोळी, तर पुरुष बांधवांना नवीन कपडे, तसेच संसारोपयोगी भांडी, मिठाई, फटाके व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते .


कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर पत्रकार वसंतराव जुमडे ,प्रा. आनंद झोरे , प्रा. विजय खेत्रे , पत्रकार सागर पनाड , सुनिल हरकाळ , विकास राजपुत यांच्या पुढाकारात उपस्थित हेकॉ . राजेश जाधव , मारोतराव सुरुशे , भाऊराव भालेराव , लक्ष्मीकांत भानापुरे , प्रदिप मोरे , विवेक कडुकर  भागवत मोरे , भुषण दंडे ,दामोधर कुडके , विजय देशमाने , कृष्णा सास्ते , ओम हरकाळ यांच्यासह विवेकानंद स्टडी सेंटर चे युवक उपस्थित होते . या वेळी 

पारधी समाज बांधवांशी   स्नेहसंवाद साधत लहान मुलांपासून ते ज्येष्ठां सोबत आनंदोत्सव साजरा केल्याने  सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते.


या प्रसंगी स्टडी सेंटर च्या युवकांणी सांगितले की,

> “समाजातील प्रत्येक घटकाने सणाचा आनंद अनुभवावा, हीच आमची भूमिका आहे. एकात्मता आणि सामाजिक समरसता जोपासणे हेच आमचे खरे उद्दिष्ट आहे.”

कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन विवेकानंद स्टडी सेंटरच्या स्वयंसेवकांनी अत्यंत उत्साहात केले. उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन “एकतेतच आपले खरे बळ आहे” हा संदेश देत समाजातील सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित केला.

शेवटी सर्व उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या समाजोपयोगी उपक्रमामुळे सुलतानपुर परिसरात विवेकानंद स्टडी सेंटरच्या सामाजिक कार्याची पुन्हा एकदा प्रशंसा व्यक्त होत आहे.

क्रॅप्शन :- गावशिवारातील पारधीवाडी वस्तीवर जाऊन भाऊबीज साजरी करतांना विवेकानंद स्टडी सेंटरचे युवक .

Post a Comment

0 Comments