Type Here to Get Search Results !

तांड्याचे सुपुत्र पोपट शिवाजी राठोड यांचा DMIHER मध्ये Ph.D. in Nursing साठी प्रवेश !

  तांड्याचे सुपुत्र पोपट शिवाजी राठोड यांचा DMIHER मध्ये Ph.D. in Nursing साठी प्रवेश !



छत्रपती संभाजीनगर, दि. १२ (प्रतिनिधी ):

तांड्याचे सुपुत्र पोपट शिवाजी राठोड यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर Datta Meghe Institute of Higher Education and Research (DMIHER), वर्धा येथे Ph.D. in Nursing मध्ये प्रवेश मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

राठोड यांनी आपले प्राथमिक शिक्षण तांड्यावर तर उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केले. २०१८ मध्ये वडिलांचे छत्र हरवूनही त्यांनी शिक्षणाची वाट न सोडता संघर्ष करत शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी हा टप्पा गाठला आहे.

या यशानंतर ‘चेतक युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’ तर्फे राठोड यांना आर्थिक सहाय्याचे आश्वासन देण्यात आले असून, त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणाला अधिक चालना मिळणार आहे.

तांड्यावर आणि परिसरात राठोड यांच्या या यशाचा भारी अभिमान व्यक्त केला जात असून, त्यांचा संघर्षमय प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

Post a Comment

0 Comments