Type Here to Get Search Results !

लोणार तालुक्यातील बिबी येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाचे अंडर 19 खेळाडूंची शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड !

  लोणार तालुक्यातील बिबी  येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाचे अंडर 19  खेळाडूंची शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये विभागीय   स्तरावर निवड !


बिबी दि. १२ (प्रतिनिधी )

 मलकापूर येथील क्रीडा संकुल येथे 10 व 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत येणाऱ्या क्रिकेट या खेळाच्या जिल्हा  स्तरीय स्पर्धेमध्ये बिबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी लोणार तालुक्याचे प्रतिनिधित्व करून लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आठ शटकात 58 धावांचे टार्गेट देऊन चमकदार कामगिरी करीत मेहकर तालुका प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना 21 धावांनी पराभूत करून घवघवीत यश मिळवून  विभागीय स्तरावर खेळण्यास पात्र ठरल्याने लोणार तालुक्यातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. 

या सामन्यात 37 धावांची उत्कृष्ट खेळी तसेच 2 ओव्हर मध्ये 4 विकेट घेणारा विद्यार्थी शिवप्रसाद जितेंद्र चव्हाण हा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला.

  मलकापूर येथे 10 व 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय अंडर नाईन्टीन लेदर बॉल  क्रिकेट  स्पर्धेत लोणार तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना वसंतराव नाईक महाविद्यालय  बिबी चे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रीतीने, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून क्रिकेट सामने जिंकून फायनल मॅच खेळून जिल्हा स्तरीय विजेतेपद मिळवून घवघवीत यश संपादन केले .व  विभागीय स्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरल्याने वसंतराव नाईक महा महाविद्यालयाचे विद्यार्थी विभाग स्तरीय स्पर्धेचे नेतृत्व करणार असल्याने बुलढाणा  जिल्ह्याचे नावलौकिक खेळाडू विद्यार्थ्यांनी वाढविला या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष अभय चव्हाण यांनी खेळांमध्ये यश संपादन करून शाळेचे नाव विभागीय स्तरावर नेल्याबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करून विभागीय स्तरावर यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या .या खेळामध्ये सहभागी झालेले अजिंक्य आटोळे, गणेश खंडागळे, युवराज गरकळ , संकेत खटके , मयूर आटोळे, धनराज अंभोरे , सुमित राठोड , शिवप्रसाद चव्हाण , सोहम चव्हाण , संकेत बनकर, सुमित मोरे, शिवांग नागरे , विवेक खार्डे, प्रथमेश डुकरे, वसीम चौधरी, धीरज चव्हाण , प्रेम दराडे, या विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा.विजय बाजड सर व प्रा अंकित चनखोरे सर, क्रीडा शिक्षक तसेच उपप्राचार्य श्री एस आर राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्राचार्य आर. बी. राठोड व सर्व प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढे होणाऱ्या विभागीय स्तरावर घवघवीत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या .


      

Post a Comment

0 Comments