सुलतानपुर : आसरा माता देवस्थानाचे पुर्ननिर्माण – नवरात्रोत्सवात घटस्थापना व मान्यवरांच्या हस्ते भव्य महाप्रसाद !
सुलतानपुर दि. ९ (प्रतिनिधी )धार्मिक श्रद्धा व परंपरेचा केंद्रबिंदू ठरलेल्या सुलतानपुर येथील लोणार रोडवरील पुरातन व जागृत आसरा माता देवस्थानाचे पुनर्निर्माण कार्यास आरंभ करण्यात आला आहे. नव्या रुपातील या देवस्थानात नवरात्रोत्सवाच्या पावन मुहूर्तावर घटस्थापना करून देवी आराधनेची सुरुवात भक्तीमय वातावरणात करण्यात आली.
म
हाप्रसादाच्या दिवसी ता. दि . ७ ला
सकाळपासूनच भक्तांचा ओघ देवस्थान परिसरात पाहायला मिळाला. जय माता दी, जय भवानी अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर फुलांच्या तोरणांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात घटस्थापना झाल्यानंतर आरतीचा कार्यक्रम पार पडला.
या निमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपती डॉ. हेमराज लाहोटी, माजी जि.प. सदस्य वामनराव झोरे, शिक्षणमहर्षी संजय लाहोटी, वसंत जुमडे, शंतनु मापारी , विश्वनाथ हरकाळ , सदानंद पाटील ,बाबु पाटील सिरसाट यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास गावातील मान्यवर, महिला मंडळ, युवक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य भाविक उपस्थित होते.
मातेच्या भक्तांच्या पुढाकाराने परिसरात सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. आरास, दिव्यांची सजावट आणि स्वच्छता यामुळे परिसर आकर्षक दिसत होता. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची सोय करण्यात आली होती यावेळी पुरोषोत्तम मोरे, प्रल्हाद टकले , राजेश परिहार , रमेश जैन, शिवाजी सुरुशे , लक्ष्मीकांत भानापुरे , राम गायकवाड , डीगांबर राजगुरु , निवृती कडुकर , सागर पनाड , भाऊराव भालेराव , गणेश रिंढे ,नारायण भानापुरे , संजाब खरात , गजानन भुतेकर , बंडु पडघान , सुभाष भालेराव , संजय गायकवाड , अंबादास पवार , कैलास जुमडे , साहेबराव झोरे , राजेश पिंपरकर , राजेश राऊत यांणी अथक परिश्रम घेतले .
यावेळी पुरोषोत्तम गाडेकर , दामुअण्णा सुरुशे , सुभाष खेत्रे , मनोहर भानापुरे , सुनिल निकम , शाहीन पटेल (विदर्भ कुन्या ) गणेश रत्नपारखी , सुखदेव झोरे , गोपाल भानापूरे , शंकर निलक आदिनी अथक परिश्रम घेतले
या वेळी मातेच्या भक्तांनी सांगितले की, “गावाच्या धार्मिक वारशाला नवे रूप देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले. नवरात्रोत्सव काळात भजन, कीर्तन, जागरण, यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.”
आसरा माता हे सुलतानपुर व परिसरातील श्रद्धास्थान असून, दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतील. पुनर्निर्माणानंतर या परिसराचे सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण भक्तांना अधिक जवळचे वाटणार आहे.

Post a Comment
0 Comments