Type Here to Get Search Results !

दिवाळी सलोख्याची! प्रवीण सिरसाट यांनी शेतमजूर, मेंढपाळ बांधवांसोबत साजरी केली दिवाळी; सामाजिक संदेशाचे वितरण

 दिवाळी सलोख्याची! प्रवीण सिरसाट यांनी शेतमजूर, मेंढपाळ बांधवांसोबत साजरी केली दिवाळी; सामाजिक संदेशाचे वितरण


सुलतानपूर दि. २१ (प्रतिनिधी )

राजकीय आणि सामाजिक वातावरणात सध्या अनेक बदल घडत असताना, सुलतानपूर  जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रवीण तेजराव सिरसाट यांनी यंदाची दिवाळी एका आगळया वेगळ्या आणि  पद्धतीने साजरी केली. त्यांनी त्यांच्या शेतात शेतमजूर आणि मेंढपाळ बांधवांसोबत एकत्र येत दिवाळीचा सण साजरा केला. या उपक्रमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा आणि सामाजिक समतेचा संदेश समाजात पोहोचवला.

सामान्यांसोबत दिवाळीचा आनंद

प्रवीण तेजराव सिरसाट यांनी दिवाळीनिमित्त शेतात एकत्र आलेल्या मुजुरांना आणि मेंढपाळ बांधवांना फराळ वाटप केले. तसेच, लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी त्यांना फटाकेही दिले. समाजातील वंचित आणि कष्टकरी बांधवांसोबत सण साजरा करण्याच्या या कृतीमुळे सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण समाजात निर्माण झाले आहे.

शिव , फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा

आजच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत, समतेचा आणि बंधुत्वाचा विचार समाजात रुजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवीण सिरसाट यांनी हाच विचार कृतीत आणत, 'माणुसकी' हाच खरा धर्म असल्याचे दर्शवले. त्यांनी कष्टकरी आणि गरजू लोकांना सोबत घेऊन सण साजरा करून, शिव ,फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारसरणीचा वारसा जपला. त्यांच्या या कृतीने समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.

यावेळी मेंढपाळ कुटुंबातील सदस्य मुन्ना गोयकर, भगवान गोयकर, अनिता गोयकर, ऐकणा आयनकर, तसेच लहान मुले सुरेश गोयकर, पूनम गोयकर आणि पंकज गोयकर उपस्थित होते.

या आनंददायी सोहळ्याला गावातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष गणेश नारायण माळेकर, तेजराव सिरसाट (भाऊसाहेब), नीलकंठ सिरसाट, एकनाथ शिंदे आणि अमोल मोसंबे यांचा समावेश होता.

प्रवीण सिरसाट यांच्या या उपक्रमाने दिवाळीच्या निमित्ताने 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा प्रत्यय आला, ज्यामुळे गावामध्ये समाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

0 Comments