Type Here to Get Search Results !

सुलतानपूर मध्ये आदर्श शिक्षक भगवानराव टकले यांचा भव्य सत्कार ! कष्टकरी संघाचा उपक्रम



सुलतानपूर दि.३

गावातील सुप्रसिद्ध शिक्षक व शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भगवान दर्याजी टकले यांचा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कष्टकरी संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. संयमी, शांत, सुस्वभावी, शीलवान आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे शिल्पकार अशी ओळख लाभलेल्या टकले सरांचा हा गौरव सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.


दसरा वाटीके  मध्ये सरपंचपती डॉ. हेमराज लाहोटी , माजी जिप सदस्य वामनराव झोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र , ट्रॉफी , शाल श्रीफळ देत  गौरविण्यात आले .

या वेळी  आश्रुबा भानापुरे , डॉ. वसंतराव देसाई , गोविंदराव रिंढे , राजेश पिंपरकर , मनोहर भानापुरे , प्रल्हाद टकले ,सुभाष खेत्रे , सुरेश सुरुशे , कैलास  हरकाळ, डिंगाबर सुरुशे , मनोहर बाप्पु भानापुरे , गुलाबराव तांगडे ,संजाब खरात , डॉ. शिवकुमार तेजनकर , कैलास पारीख सर , बंडु पडघान , पवन लाहोटी संजय गायकवाड , कैलास हरकाळ , राजेश बोबडे मारोतराव सुरुशे , डीगांबर भालेराव , वैभव टकले , साईनाथ डुबे , दत्ता रिंढे , शंकर निलक , शिवशंकर काळे , ज्ञानेश्वर बोबडे , ... .. . . आदिंची प्रमुख उपस्थिती होती .

" पत्रकार वसंत जुमडे यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या सन्मान सोहळ्याचे मार्गदर्शक संजय लाहोटी , गजानन भानापुरे , विश्वनाथ हरकाळ हे होते डॉ. विनोद भानापुरे यांणी सन्मानपत्राची महती सागत वाचन केले ".

पुढील वर्षीयाच स्वरूपाचे एक  युवा व एक जेष्ठ यांच्या आदर्श जिवनशैलीचा आढावा घेत त्यांच्या कार्यातुन इतरांना प्रेरणा मिळावी या हेतुने गावकरयां समक्ष सरपंच महोदया यांच्या हस्ते  पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याचे कष्टकरी संघाचे अध्यक्ष पत्रकार सागर पनाड यांणी विशद केले तर  वंचीत कष्टकरी ,शेतकरी , निराधार यांच्या पर्यंत कष्टकरी संघाची ही चळवळ पोहचविण्यासाठी अथक परिश्रम घेणारे संघटन सचिव भाऊराव भालेराव यांनी कार्यक्रमादरम्याण मान्यवरांचे मनस्वी आभार व्यक्त केले 


🥇सन्मानपत्र🥇


शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,

संयमी, शांत, सुस्वभावी, शीलवान,

अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे,

सेवानिवृत्त ज्ञानी शिक्षक

!! भगवान दर्याजी टकले !!


यांच्या कार्याचा व गुणांचा आम्हा सुलतानपुरवासीयांना सदैव अभिमान आहे.

शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान, शिस्तप्रिय जीवनशैली आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून

कष्टकरी संघ त्यांचा आज विशेष गौरव करीत आहे.



"ज्ञानदीप लावला तुम्ही, उजळल्या कितीतरी वाटा,

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवली संस्काराची मळवाटा,

भगवानराव टकलेंसरांचे कार्य अमोल, प्रेरणेचा दीपस्तंभ खास,

सुलतानपुरचे अभिमान तुम्ही, शिक्षकधर्माचा सुवर्ण प्रकाश !"

"ज्ञानदीप लावला तुम्ही, उजळल्या कितीतरी वाटा,

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवली संस्काराची मळवाटा,

भगवानराव टकलेंसरांचे कार्य अमोल, प्रेरणेचा दीपस्तंभ खास,

सुलतानपुरचे अभिमान तुम्ही, शिक्षकधर्माचा सुवर्ण प्रकाश !"

Post a Comment

0 Comments