Type Here to Get Search Results !

सुलतानपूर येथे सेवाव्रतींचा सत्कार सोहळा ! शिक्षण , संस्कृती आणि सेवाभाव जोपासणाऱ्यांचा गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार

 सुलतानपूर येथे सेवाव्रतींचा  सत्कार सोहळा !

शिक्षण , संस्कृती आणि सेवाभाव जोपासणाऱ्यांचा गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार !





सुलतानपूर दि. ३० (प्रतिनिधी) :

 शिक्षण, सामाजिक कार्य, सांस्कृतिक जाणीवा व सेवाभाव यांना सलाम करत गावकऱ्यांच्या वतीने सेवाव्रतीं चा सत्कार सोहळा दि.२७ करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, नागरिक व पत्रकार आदिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संतकृपा गृह उद्योगाच्या सभागृहात  आयोजीत 

कार्यक्रमाची सुरुवात सदगुरु संत सखाराम महाराज  पूजन करुण सरपंचा सौ. किरणताई हेमराज लाहोटी यांच्या अध्यक्षते खाली व या कार्यक्रमाचे संयोजक पत्रकार वसंत जुमडे यांच्या प्रास्तावनेने या सत्कार सोहळ्याला आरंभ करण्यात आला  

या विशेष सोहळ्यात मुख्याध्यापक सुनिल सोळंके सरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोळंके सरांनी शिक्षकी पेशाला सार्थकी ठरवत पुस्तकी ज्ञानाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक जाणीवा, परस्परांबद्दल आस्था व आदरभाव रुजवले. प्रत्येकाशी स्नेहभावाने वागत त्यांनी खऱ्या अर्थाने गुरुजींची भूमिका निभावत असल्याच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला .

तर सेंट्रल बँक ऑफ इंडीया च्या रोखपाल सौ. मुंजुर्षी चव्हाण  यांचा ग्राहकांशी सौजन्यपूर्ण व आदरयुक्त वागणूक आणि कर्तव्यनिष्ठ वृत्तीबद्दल  करण्यात येणारा सत्कार बॅकेचे कर्मचारी अशोक टकले यांच्या कडून स्विकारण्यात आला .

सुलतानपुर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेवरील  शिक्षक मनोज खुळे यांचा देखील त्यांच्या विद्यार्थीप्रिय स्वभाव व शिक्षण क्षेत्रातील आस्था यासाठी सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे शिक्षक म्हणून त्यांचे योगदान अधोरेखित करण्या सारखे असल्यानेच त्यांना सन्मानीत करण्यात आहे. या वेळी

सांस्कृतिक क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या मंडळांचाही  गौरव झाला. सिद्धिविनायक गणेश मंडळाने डीजे संस्कृतीला नकार देत पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. या उपक्रमामुळे गावात संस्कारमय वातावरण निर्माण झाले तर  शेतकरी गणेश मंडळाने शेतकरी जीवनाशी नाळ जोडणारी संकल्पना मांडत बैलगाडीतून चिमुकल्या वारकऱ्यांसह हरिनामाचा गजर करीत शोभायात्रा काढली. भक्तीमय वातावरण निर्माण करणाऱ्या या मंडळाचे अध्यक्ष गोविंद नालींदे , डॉ. निसर्ग वाकोडे , विवेक कडुकर , राम लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांचा देखील सन्मान करण्यात आला दरम्यान उपस्थित मान्यवर डॉ. हेमराज लाहोटी , वामनराव झोरे , शांतीलाल बोराळकर , सौ. स्वातीताई जुमडे , आदिंनी सत्कारमुर्तीच्या कार्याचा आढावा विशद केला तर सन्मानपत्राचे वाचन प्राचार्य गजानन धांडे व प्रा.आनंद झोरे यांणी केले  या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉ. वसंतराव देसाई , हणुमंतराव चव्हाण , पुरोषोत्तम गाडेकर , दामुआण्णा सुरुशे , हरिभाऊ रिंढे , मोहन जैन , पत्रकार सुनिल हरकाळ , पोहेकॉ राजेश जाधव , प्रा. विजय खेत्रे , नाना भानापुरे  दिपक राजगुरु नंदकिशोर भानापुरे , संतोष तोतरे ,मनोहर भानापुरे , शाम जाधव , विनोद मोरे  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार सागर पनाड यांणी तर आभार विश्वनाथदादा हरकाळ यांनी केले या वेळी गावातील मान्यवर, पत्रकार व नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता .

 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व मंडळांचा सत्कार झाल्याने त्यांचे मनोबल वाढले असून, समाजात चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळण्यास हातभार लागला, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments