Type Here to Get Search Results !

श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा विस्तारीकरण सोहळा खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न ! आत्यांधुनिक रोबोटिक सेंटर च्या माध्यमातुन भारतातील प्रथम रोबोटिक सुविधा उपलब्ध !

 श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा विस्तारीकरण सोहळा खा. प्रतापराव जाधव  यांच्या हस्ते संपन्न !

आत्यांधुनिक रोबोटिक सेंटर च्या माध्यमातुन 

भारतातील प्रथम रोबोटिक सुविधा उपलब्ध !




सुलतानपुर दि. २९ (प्रतिनिधी )

  आरोग्य सुविधांबाबत चे आत्यांधुनिक तंत्रज्ञान , यंत्र सामोग्री , उच्चशिक्षीत तज्ञ डॉक्टरां सह सर्व सुविधा  श्रीराम हॉस्पिटल च्या माध्यमातून  डॉ. हेमराज लाहोटी यांणी सुलतानपुर येथे उपलब्ध करुण दिल्याने रुग्णांना मोठ मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागत नसल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले ते ता. २९ ला श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या विस्तारीकरण  कार्यक्रमा प्रसंगी उद्‌घाटक म्हणून  बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे विस्तारीकरण होत असतांना   या मध्ये प्रसाद मेडीकल , प्रसाद ब्लड स्टोरेज , अदयावत सुविधापुर्ण पंचकर्मा सेंटर आणि भारतातील एकमेक असलेले अत्याधुनिक रोबोटिक सेंटर ह्या सुविधा श्रीराम हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजु रुग्णांना आता  मिळणार आहेत ही आपल्या ग्रामीण भागासाठी आणि बुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार खा. प्रतापराव जाधव यांणी काढले या वेळी प्रा. बळीराम मापारी , माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर , भगवानराव सुलताने , वामनराव झोरे यांची प्रमुख उपस्थिती होती .

श्रीराम हॉस्पिटलचे संचालक अर्धांगवायु तज्ञ डॉ. शशिराज लाहोटी व डॉ. ज्योतीताई शशिराज लाहोटी यांणी प्रास्तावनेतुन हॉस्पिटलच्या व रुग्णसेवेचा आढावा मांडला तर ग्रामीण भागातील अपघातग्रस्त व विविध आजारांच्या रुग्णांना ब्लड स्टोरेज , पंचकर्मा , रोबोटीक च्या उपचार पद्धतीचे  महत्व विषद करीत . उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी सुलतानपुर डॉक्टर असोशियन चे सर्व पदाधिकारी , सुलतानपुर ग्रा.प.च्या सरपंचा किरणताई लाहोटी व परिसरातील सर्व ग्रामपंचायत चे सरपंच सदस्य व प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .  ह्या संपर्ण कार्यक्रमाच्या  यशयशस्वीतेसाठी श्रीराम हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .



Post a Comment

0 Comments