Type Here to Get Search Results !

महाराजस्व अभियानांतर्गत शिबिरात दाखले वाटप व तक्रारींचा निपटारा !

 


सुलतानपुर दि. २८ (प्रतिनिधी ): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत सुलतानपुर  महसुल मंडळांमध्ये २८सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा व दाखले वाटप  करण्यात आले .

लोणार  तहसीलदार भुषन पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या शिबीरात

सुलतानपुर ग्रा.प. चे सरपंचपति डॉ. हेमराज लाहोटी , माजी जि.प. सदस्य वामनराव झोरे , भाजपा किसान मोर्चाचे मारोतराव सुरुशे , पो.पा. सौ.रेखा भानापुरे , उपसरपंच गोपाल भानापुरे , तमुअ राजेश पिंपरकर , आदि प्रामुख्याने उपस्थीत होते .

सुलतानपुर येथील वेदांत आश्रम येथे आयोजीत या शिबीरात नायब तहसीलदार परळीकर मॅडम , डोळे , संजय गांभी निराधार चे ईप्पर , पुरवठा विभागाच्या दांडगे मॅडम मंडळाधिकारी खारवाल , केंद्रे व ग्राम महसुल अधिकारी संतोष पनाड ,  फोलाने , पवार मॅडम , संदिप देव्हडे ,ग्रामविकास अधिकारी गजानन कावरखे ,कृषी सहाय्यक देशमुख यांनी नागरिकांना 

 महसूल सप्ताहाच्या निमित्ताने या शिबिरात शेतकऱ्यांना जिवंत सातबारा वाटप, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात व अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, सामाजिक कल्याण योजनांचा लाभ त्याच बरोबर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्या कडून आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर लागणार नाही, ३१ डिसेंबर २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र

नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. 'प्रधानमंत्री योजने अंतर्गत सर्वांसाठी घरे, 'पाणंद रस्ते आणि शिवपांदण, वहिवाट रस्ते १२ फूट रुंदीचे रस्ता तयार करणे तथा आदी महसुल विभागाशी संबंधित सेवा बद्दल माहिती तहसीलदार पाटील   यांच्याकडून देण्यात आली.

दरम्याण मंडळातील अनेक शेतकरी व विविध योजनेच्या लाभार्थ्यांणी ऍग्री स्टॅक , संजय गांधी निराधार , राशनकार्ड केवायसी , अतिवृष्टी अनुदान केवायसी , कृषी विभाग , आरोग्य विभाग , पशुवैदयकीय विभाग , भुमी अभिलेख , जि.प. व प.स. च्या विविध योजनेच्या लाभार्थ्यानी या शिबीरात माहीती घेतली तर अनेकांना दाखले वाटप करण्यात आले . शिबीरामध्ये सर्व सेतु चालक उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments