सुलतानपूर दि. २७ (प्रतिनिधी )
शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त अमित मंत्री मित्र परिवार व देसाई हॉस्पिटल, सुलतानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत देसाई हॉस्पिटल, जालना रोड येथे संपन्न झाले . या शिबिरासाठी रक्तपेढी म्हणून लोकमान्य ब्लड बँक, छत्रपती संभाजीनगर यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी ७१ उत्साही रक्तदात्यांनी सहभाग घेऊन अमूल्य रक्तदान केले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजसेवेची अनोखी जाणीव प्रकट केली.
या सामाजिक उपक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित दर्शवित आपला सहकार्याचा हात दिला. यामध्ये डॉ. वसंतराव देसाई, गोविंदभाऊ मंत्री, माजी प्रा. कैलास पारीक, डॉ. अजय देसाई, डॉ. दीक्षा देसाई, अमित मंत्री, दिलीप सुरुशे, डॉ. आमिर शेख, पवन दांडगे, नागेश भोसले, शाम रिंढे, डॉ. अरुण गवळी, डॉ. सचिन केदार, सुमित मंत्री, जय देसाई, गणेश नागरिक, विशाल राजगुरू, कैलास गाडेकर, सिद्धेश्वर सुरुशे, सोनू देशपांडे, सागर पडघान, तुषार बोराळकर आदी मान्यवरांचा सहभाग लक्षणीय होता.
या यशस्वी उपक्रमाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, मान्यवर व सहकार्य करणाऱ्याचे मनःपूर्वक आभार मानले. समाजासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Post a Comment
0 Comments