लोणार तालुका बिबी येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेची स्थापना !
लोणार ता. (प्रतिनिधी दि. २३ )
तालुक्यातील बिबी येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील पहिल्या ग्रामशाखेचे उदघाट्न लोणार तालुका अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. सुधाकर आत्माराम वानखेडे यांच्या हस्ते दिनांक 21सप्टेंबर रोजी बिबी येथे करण्यात आले.
कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा दक्षिण चे जिल्हा अध्यक्ष आद पी बी इंगोले, जिल्हा सरचिटणीस आद अशोक काकडे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा बिबी ग्रामशाखेच्या अध्यक्षस्थानी आद सीताराम इंगळे सरचिटणीसपदी भीमराव इंगळे, कोषाध्यक्ष पदी आद. सुरेश बनसोडे तर संस्कार उपाध्यक्ष आद प्रभाकर इंगळे, उपाध्यक्ष पर्यटन प्रचार आद सूर्यभान हिवाळे, उपाध्यक्ष संरक्षण आद भानुदास लहाने, हिशोब तपासणीस आद संदीप पनाड, कार्यालईन सचिव आद सुमेध अंभोरे, सचिव संस्कार आद प्रल्हाद साळवे, दिपक वानखेडे,सचिव पर्यटन आद प्रकाश वाकळे, संतोष काकडे, सचिव संरक्षण आद अजय साळवे,सचिन निकाळजे, संघटक आद समाधान इंगळे,आद अश्विन निकाळजे,आद सचिन, आद विनोद इंगळे, आद बंडुजी हिवाळे, आद राजरत्न अंभोरे, आद गजानन इंगळे या प्रमाणे निवड करण्यात आली.
शाखा उदघाट्न कार्यक्रमाच्या उपस्थित जनसमुदायास जिल्हाअध्यक्ष आद पी बी इंगोले, सरचिटणीस आद अशोक काकडे, जिल्हा हिशोब तपासणीस आद पी पी वाकोडे,जिल्हा कार्यालाईन सचिव आद सदाशिव साबळे, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष आद रामभाऊ साळवे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष आद गौतम खरात चिखली तालुका अध्यक्ष आद खिल्लारे मामा,वंचितचे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष आद मधुकर साळवे, लोणार तालुका भारतीय बौद्ध महासभा संस्कार सचिव आद तुळशीदास घेवन्दे,यांनी आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमला लोणार तालुका शाखेचे सरचिटणीस आद राहुल अंभोरे, आद विजय वानखेडे, आद अण्णा इंगळे, ऍड आद सुभाष लहाने,आद तुकाराम साळवे साहेब, आद शिवाजी आनंदराव,माजी सरपंच आद सतेश लांडगे, आद विनोद दाभाडे, आद समाधान मोरे,माजी अध्यक्ष आद श्रावण साळवे,माजी सरपंच गजानन काकडे, सरपंच राजेश इंगळे, आद मंगेश मोरे, आद सुभाष मोरे, आद राहुल अंभोरे,कार्यक्रमास विजय अंभोरे गजानन पगारे, भास्कर वानखेडे, किशोर लहाने, अभिमान मुळे,कडुबा म्हस्के, महेंद्र सोनुने,उपासिका महिला मध्ये जनाबाई अंभोरे,वनिता इंगळे,सुषमा साळवे,भारती इंगळे, कमलबाई भालेराव, शोभा इंगळे, इंदुबाई साळवे, रामकोर इंगळे, सिंधुबाई साळवे, कांताबाई पाखरे, यमुनाबाई इंगळे, पारबती इंगळे, शोभा साळवे,लता इंगळे आदी बहुसंख्य श्रद्धावाण नागरिक हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्कार विभागाचे आद शिवाजी डोंगरदिवे सूत्रसंचालन आद.विजय वाघ तर आभार आद संतोष गवई यांनी मानले शेवटी अध्यक्षीय भाषणा नंतर सरणतय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.उपस्थितास फराळदान शाखा पदाधिकारी प्रकाश वाकळे यांनी तर मुख्य अतिथीस भोजनदान माजी सरपंच गजानन काकडे यांनी दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका पदाधिकारी विजय वाघ नवनिर्वाचित ग्रामशाखेच्या पदाधिकारी यांनी श्रम घेतले.

Post a Comment
0 Comments