Type Here to Get Search Results !

स्वस्थ्य नारी सशक्त परिवार " अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन !

 सुलतान


पूर प्रा.आ.केंद्रात 

"स्वस्थ्य  नारी सशक्त परिवार " अभियानांतर्गत  शिबिराचे आयोजन !

सुलतानपुर ता. २०

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  ता. २० ला  स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सरपंचपती डॉ. हेमराज लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वि.वि.का.सो. अध्यक्ष   वामनराव झोरे ,  भाजपा किसान मोर्चा महामंत्री  मारतोराव सुरुशे , गजाननराव मापारी , सुभाष भानापुरे , गणेश अंभोरे , सुभाष रत्नपारखी , गणेश तागडे , विजय मापारी यांच्यासार शाहीन पटेल , डॉ. नन्हई , वैभव टकले , ज्ञानेश्वर हरकाळ , तसेच  ग्रामपंचायत सदस्य व

तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते यावळी उपस्थित प्रतिष्ठीतांचा प्रा.आ.केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला .

तर  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दैवशाला बलसेटवाड  यांच्या मार्गदर्शना खाली तर वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल पिसे  व डॉ. किरण सोनी  यांच्या देख रेखी खाली आयोजित करण्यात आले . या शिबिरासाठी तज्ञ डॉ. सातपुते , डॉ. देसाई   डॉ . अंजली पिसे  व डॉ . किरण सोनी  तसेच इतर तज्ञ डॉक्टरांनी शिबीरात साठी आलेल्या  गरोदर माता तसेच स्त्रियांची   , लहान बालकांची  तसेच आलेल्या रुग्णांची  तपासणी करूण औषधोपचार  केला .

या वेळी अंजली शरद गायकवाड हिला पोषण आहार किट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी , कर्मचारी , गटप्रवर्तक , आशा सेविकांचा  सक्रिय सहभागी  झाल्या होत्या .

Post a Comment

0 Comments