Type Here to Get Search Results !

तहसीलदार भुषण पाटील यांचा वाढदिवसानिमित्त शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार




लोणार दि. १४ (प्रतिनिधी) 

लोणार तहसीलचे कार्यत्तपर तहसीलदार भुषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १३ ला शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने  सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला .


युवा सामाजीक कार्यकर्त तथा विजवितरण कंपनी चे वरिष्ठ तंत्रज्ञ पंजाबराव बोबडे यांच्या निवस्थानी आयोजीत सत्कार सोहळ्यात धानोरा येथील माजी सरपंच हणुमंतराव चव्हाण, प्राचार्य गजानन धांडे , येसापुर - भानापुर ग्रा.प . सरपंचपती पंजाबराव धांडे , धानोरा राजनी ग्रा.प.चे सरपंच दत्तात्र्य पडघान , जेष्ठ सामाजीक कार्यकर्त विष्णुपंत सुरडकर , शिक्षक मधुकर मोठे , संजाबराव धांडे , युवा शेतकरी प्रकाश धांडे , अंकुश धांडे , कष्टकरी संघाचे अध्यक्ष पत्रकार सागर पनाड यांच्या सह  विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, व्यापारी, शिक्षक व युवक  उपस्थित होते. कार्यक्रमात पाटील यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

भुषण पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या कामकाजाच्या पद्धतीतून शेतकऱ्यांशी जवळीक साधली आहे. शेतरस्त्यांचे प्रश्न, पिकविमा अर्ज, जमिनीच्या नोंदीतील अडचणी, वारस नोंदणी तसेच शेतकरी सभागृहातील दैनंदिन समस्या यांचा वेळेत निपटारा करून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे. महसुली कामकाजातील पारदर्शकता आणि तत्परता ही त्यांची खास वैशिष्ट्ये मानली जातात.

 “तहसीलदार भुषण पाटील हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतात. कोणतीही समस्या घेऊन गेलो की त्यांच्या कार्यालयात तात्काळ तोडगा मिळत असल्या चे मत  अनेकांणी बोलून दाखविले"

सामाजिक कार्यकर्त्यांनी  पाटील यांच्या लोकाभिमुख कारभाराचे कौतुक केले. गावोगावी होणाऱ्या भेटीद्वारे ते लोकांच्या अडचणी समजून घेतात व प्रशासनाकडे त्वरित दखल घेण्यास प्रवृत्त करतात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार भुषण पाटील यांनी  उपस्थितांचे आभार मानले व पुढेही शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी अधिक उत्साहाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments