लोणार दि .२० (प्रतिनिधी )
लोणार तालुक्यातील मातोश्री फाउंडेशन व मातोश्री महिला अर्बन बिबी यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, पिंप्री खंदारे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन आयुक्त मा. गजानन घीरके हे आपल्या कर्मचाऱ्यासह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात घीरके यांणी “एक वृक्ष लावा – आरोग्य वाढवा” असा संदेश देत प्रत्येकाने किमान दोन तरी वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.
या प्रसंगी मातोश्री फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. डी. के. गायके , बीबी मेडिकल असोसिएशनचे दीपक गायकवाड, पवन दंदाले, अशोक नरवाडे, रंजीतभाऊ सानप, नागेश काकड, बादल राठोड, ऋषिकेश सोनूने, नागरे, वराडे तसेच त्यांचे मित्रपरिवार उपस्थित होते. यावेळी मातोश्री फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व वृद्धाश्रमातील वृद्ध यांनीही वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे परिसरात हरिताई वाढून पर्यावरणपूरक संदेश दिला गेला असून, मातोश्री फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments