Type Here to Get Search Results !

डॉ. शशीराज लाहोटी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा वृक्षारोपण, मिठाई वाटप, विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार पेट्या भेट

 डॉ. शशीराज लाहोटी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

वृक्षारोपण, मिठाई वाटप, विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार पेट्या भेट


सुलतानपूर दि . १० (प्रतिनिधी )

सुलतानपूर येथील अर्धांगवायू तज्ज्ञ डॉ. शशीराज लाहोटी यांचा ३७ वा वाढदिवस विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.



यावेळी जिल्हा परिषद शाळा, सुलतानपूर येथे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेला प्राथमिक उपचार पेट्या (फर्स्ट एड बॉक्स) भेट देण्यात आल्या.


याप्रसंगी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल बोराळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शालेय विद्यार्थ्यांवर आपत्कालीन परिस्थितीत मोफत उपचार करण्याचा मानस व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आरोग्याबाबत जागरूक राहून स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला डॉ. ज्योतीताई लाहोटी, डॉ. अमोल बोराळकर,डॉ. भागवत जाधव , डॉ. प्रशांत तेजनकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जुमडे, डॉक्टरांची टीम, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी शाळेच्या वतीने डॉ. शशीराज लाहोटी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छता आणि प्राथमिक उपचारांचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.


दरम्यान, वाढदिवसानिमित्त गावातील पशुपतीनाथ मंदिर , गजानन महाराज मंदिर , विठ्ठल रुक्मिनी मंदीर , स्मशान भुमी , प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तर सायंकाळी  श्रीराम हाऊस्पिटल मधील गरजु रुग्णांन च्या नातेवाईक  व डॉ.आर. एन. लाहोटी कॉलेज च्या विद्यार्थी साठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली . डॉ.शशीराज लाहोटी यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या ३७ वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली, हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

Post a Comment

0 Comments