Type Here to Get Search Results !

सुलतानपुर येथे सावित्रीमातेला अभिवादन !


सुलतानपुर दि. ११ (प्रतिनिधी) – स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची जननी, समाजप्रबोधनाची मशाल प्रज्वलित करणाऱ्या महान समाजसुधारक सावित्री बाई फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुलतानपुर येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

दि. १० मार्च रोजी सायंकाळी सुलतानपुर येथील क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले  व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीमातेच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या अथक संघर्षामुळे आज समाजात महिलांना शिक्षण व सन्मानाचे स्थान प्राप्त झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी पत्रकार वसंत जुमडे, सागर पनाड, ममताताई प्रेम झोरे, रमेश बळी सर, प्रेम झोरे, सचिन सुरुशे, माधव खानझोडे, विकास राजगुरू, बंडू अवचार, अजय सुकुशे, वैभव भराड, नंदकिशोर ढगे, शुभम भालेराव, मोहन राजगुरू, उमेश टकले, संतोष सुरुशे, दत्ता राखुंडे, अरुण सुरुशे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांवर चालत समाजात शिक्षणाची ज्योत अखंड पेटती ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. या अभिवादन कार्यक्रमाला युवा वर्गाचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments