*सांस्कृतिक वैविध्याने उजळला लाहोटी महाविद्यालयाचा गणेशोत्सव*
सुलतानपूर दि. ६ (प्रतिनिधी ) डॉ. आर. एन. लाहोटी महाविद्यालयात यंदाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला. महाविद्यालयात दरवर्षी साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवाला यंदा विशेष आकर्षक रूप देण्यात आले होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, बॉक्स क्रिकेट लीग, रस्सीखेच, संगीत खुर्ची या मनोरंजक स्पर्धांचा समावेश होता. याशिवाय महाविद्यालयीन वातावरण रंगतदार करण्यासाठी ट्रॅडिशनल डे, ट्विन्स डे, मिसमॅच डे, रेट्रो बॉलिवूड डे असे दिवसही साजरे करण्यात आले.
या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला. विविध स्पर्धांमधून त्यांनी आपली कला, सर्जनशीलता आणि टीम स्पिरिट प्रदर्शित केली. काहींनी रांगोळीतून देखावे साकारले, काहींनी पोस्टरमधून सामाजिक संदेश दिला तर क्रीडा स्पर्धांमध्ये जोशपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.
संस्थेचे अध्यक्ष मा. संजूभाऊ लाहोटी यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐक्य, सर्जनशीलता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. केवळ शैक्षणिकच नव्हे तर सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी प्रगती करावी हेच आमचे ध्येय आहे.”
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडले.
गणेशोत्सवाच्या या उपक्रमांमुळे महाविद्यालयात ऐक्य, आनंद आणि सांस्कृतिक बंध दृढ झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
यंदा गणेशोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी डॉ. आर. एन. लाहोटी पॉलीटेकनिककडे देण्यात आली होती. या दरम्यान प्राचार्य अतुल पडघान यांनी सर्व कर्मचाऱ्यांसोबत योग्य समन्वय साधत गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पाडला.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यासाठी प्राचार्य डॉ. नंदू कायंदे, प्राचार्य. सुरुशे, प्राचार्य भावना जाधव, प्राचार्य डॉ. मीनल राऊत, प्राचार्य डॉ. वाघमारे प्रा.डॉ. नवघरे सर, प्रा.डॉ.सरकटे सर, प्रा. कावरखे सर, प्रा. लहाने सर, प्रा. दिवटे सर, प्रा. नालेगावकर, प्रा. वानखेडे, सागर जोशी तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण उत्सवाचे कोषाध्यक्ष दिनेशजी नवगजे, सचिव सोमेशजी लाहोटी यानी कौतुक केले.
क्रिकेटने वाढवली रंगत** "
"गणेशोत्सवाच्या उपक्रमांत लाहोटी पोलिटेक्निकद्वारे आयोजित बॉक्स क्रिकेट लीगने विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण वेधले. पोलिटेक्निक महाविद्यालयाच्या आवारात भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध कॉलेजच्या संघांनी उत्साहाने भाग घेतला यामध्ये मुलांचे 12 तर मुलींचे 08 अश्या एकूण 20 संघांनी सहभाग घेतला. सामन्यादरम्यान प्रेक्षक विद्यार्थ्यांनी दिलेल्या जल्लोषपूर्ण प्रतिसादामुळे वातावरण रंगून गेले होते.
साखळी फेरीत अनेक चुरशीचे सामने रंगले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी अप्रतिम फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण सादर केले. विद्यार्थ्यांनी दाखवलेली संघभावना आणि खेळाडूवृत्ती उल्लेखनीय ठरली ".
अंतिम सामन्यातील रोमांचक लढतीने उत्सवाचे आकर्षण अधिक वाढवले.
यामध्ये अंतिम सामन्यात मुलांच्या बी.एच.एम. एस.संघाने तर मुलींच्या जी. एन. एम.संघाने बाजी मारली. सर्व सामन्यादरम्यान मुख्य पंच म्हणून प्रा. बादल म्हस्के यांनी काम पाहिले. स्कोरर म्हणून प्रा. गणेश खरात व प्रा. डॉ. शुभम परिस्कर यांनी काम पाहिले.
प्रा. संजय मंगवाडे यांनी समलोचक म्हणून काम केले.
स्पर्धेच्या समारोपीय भाषणात बोलताना प्राचार्य पडघान म्हणाले “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमातही सहभागी व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे. अशा उपक्रमांतून त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो, संघभावना विकसित होते आणि समाजाशी नातं दृढ होतं.”
विजेत्या संघाचा सत्कार अध्यक्ष संजूभाऊ लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आला.


Post a Comment
0 Comments