विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम : टाकाऊ वस्तूंमधून इकोफ्रेंडली गणपती व हेमाडपंथी महादेव मंदिराचा देखावा !
सुलतानपुर ता.२ :
सण-उत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक संदेश देण्याची गरज वाढत असताना सुलतानपुर येथील विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा प्रयोग साकारून दाखवला आहे. रद्दी पेपर, पुठ्ठे, नारळाच्या करवंट्या आणि इतर टाकाऊ वस्तूंचा वापर करून इकोफ्रेंडली गणपती बाप्पा व हेमाडपंथी महादेव मंदिराचा देखावा उभारल्याने अनेक जन देखावा पाहुण कौतुक व्यक्त करतात .
या उपक्रमात सुलतानपुर येथील सावजी परिवाराचे विठ्ठल सदाशिव दिपकवार, नेहा जगन्नाथ दिपकवार व कार्तिक जगन्नाथ दिपकवार यांनी कल्पकता दाखवत विशेष मेहनत घेतली. टाकाऊ वस्तूंमधून साकारलेली मूर्ती व देखावा इतके सुबक आणि आकर्षक आहेत की पाहणाऱ्यांची पावले आपसूकच या कलाकृतीकडे वळली.
गणेशमूर्तीची सजावट पूर्णपणे रद्दी कागद व पुठ्ठ्यापासून करण्यात आली होती. नारळांच्या करवंट्यांपासून नैसर्गिक रंगसंगती देण्यात आली. तर हेमाडपंथी महादेव मंदिराचा देखावा पाहताच प्राचीन काळातील मंदिराचीच अनुभूती मिळते. विशेष म्हणजे, संपूर्ण देखाव्यात एकही प्लास्टिकचा वापर न करता ‘हरित संदेश’ जपला गेला.
ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत, “सण केवळ भक्तीचा नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. या मुलांनी दाखवलेला मार्ग समाजासाठी प्रेरणादायी आहे”, असे मत कष्टकरी संघा कडुण व्यक्त करण्यात आले .
बॉक्स :
दिवाळीत गड-किल्ल्यांचे देखावे !
"हीच मुले दरवर्षी दिवाळीच्या दिवसात गड-किल्ल्यांचे देखावे घरी साकारत असतात. त्यामुळे सण-उत्सवांतून कला, इतिहास आणि पर्यावरण यांचा संगम जपण्याचे कार्य दिपकवार (सावजी ) कुटुंबातील मुलांकडून होत आहे ".
क्रॅप्शन : सुलतानपुर येथे सावजी परिवाराने साकारला पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचा देखावा .

Post a Comment
0 Comments