पारडी - बोरखेडी तंटामुक्ती अध्यक्षपदि
गणेश माळेकर !
लोणार दि. १
तालुक्यातील
गट ग्रामपंचायत पारडी - बोरखेडी च्या महात्मा गांधी तंटामुक्त गांव समीतीच्या अध्यक्ष पदी श्री गणेश नारायण माळेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
पारडी - बोरखेडी गट ग्रामपंचायत ची ग्रामसभा ता . २५ ऑगष्टला सरपंच सौ.शोभा पंजाबराव सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदरच्या वेळी ही निवड सर्वानुमते करण्यात आली असुन या समितीमध्ये प्रविण सिरसाट ,सुरेश सिरसार , प्रमोद थोरात , कैलास बाबुळवार , संदिप गायकवाड , दिनकर तुपकर , दिपक साळवे , लीला मते , मिना मांडवेकर यांच्या सह विविध क्षेत्रातील व्यक्तीची निवड करण्यात आली या वेळी उपसरपंच सौ.अश्विनी सिरसाट यांच्यासह ग्रा.प. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment
0 Comments